महाराष्ट्रातील अष्टविनायक गणेश देवस्थाने - अष्टविनायकयात्रा
गणपती किंवा गणेश भारतात सर्वाधिक पूजनीय दैवत आहे.पवित्र अष्टविनायक देवस्थानांमुळे महाराष्ट्राला एक विशिष्ट वलय प्राप्त झाले आहे. “अष्टविनायक” या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे “आठ गणपती”. ही आठ मंदिरे वेगवेगळ्या ठिकाणी स्थित आहेत, आणि अशी मान्यता आहे की हे सगळे गणपती “स्वयंभू” अर्थात स्वतः उत्पन्न झाले आहेत.आणि या सर्व गणेशमूर्ती “जागृत” आहेत, अर्थात त्या भाविकांचे मनोरथ पूर्ण करतात.